रुग्णांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याची गरज
महात्मा फुले, राजीव गांधी योजनेत जास्त प्रकार घडू लागले
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गोरगरिबांचे ऑपरेशन मोफत झाले पाहिजेत, यासाठी शासन विविध योजना लागू करत आहे. यात महात्मा फुले योजना, राजीव गांधी योजना यासह इतर योजना आहेत. या योजनांचा मोठा फायदा गोरगरिबांना होत आहे. परंतु येथील काही रुग्णालयात गेल्या काही महिन्यापासून चक्क ओटी असिस्टेंटच ऑपरेशन करत असल्याचे प्रकार सुरु आहेत. हे प्रकार शासनाच्या योजनेत जास्त प्रमाणात घडत आहे. यामुळे अनेक रुग्णांना त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. यात सर्व गोरगरिब असल्यामुळे याची तक्रार होत नाही, याचा फायदा येथील काही रुग्णालय घेत, मनमानी करु लागले आहेत. यात आता संबंधित विभागानेच लक्ष देऊन हे प्रकार बंद करुन संबंधित डॉक्टरांचे प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी होत आहे.
बीड शहरातील पाच ते आठ रुग्णालयात महात्मा फुले, राजीव गांधी योजनेत अनेक ऑपरेशन होत आहेत. यात जास्त प्रमाणात अपघात झालेल्या रुग्णांचे छोटे छोटे ऑपरेशन येथे होतात. यात कुणाचे हात मोडलेले किंवा पाय मोडलेले असतील तर ते ऑपरेशन येथील काही रुग्णालयात चक्क ओटी असिस्टेंटच (डॉक्टरच्या हाताखालील) करु लागले आहेत. यात विशेष म्हणजे एखाद्या रुग्णांचे ऑपरेशन करताना एक भुलतज्ञ असतो, परंतु ओटी असिस्टेंटच भुल देत सर्व प्रक्रिया करु लागले आहेत. यामुळे यात अनेक वेळा रुग्णांना विविध दुष्परिणामाचा सामना करावा लागतो. परत औरंगाबादला जाऊन परत ऑपरेशन करण्याची वेळ सुद्धा अनेकांवर आली आहे. यामध्ये सर्व सामन्य कुटूंबातील रुग्ण असल्यामुळे याची तक्रार आज पर्यंत कुठे झालेली नाही. यामुळे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या प्रकरणी आता संबंधित विभागाने लक्ष देऊन हे प्रकार रोखून येथील रुग्णांना दिलासा देण्याची गरज आहे.
योजनेत दलाल टोळी सक्रिय
महात्मा गांधी, राजीव गांधी यासह इतर योजनेत होणारे ऑपरेशन मोफत असतात, परंतु यात रुग्णांची दिशाभुल करुन पैसे कमवणारी दलाल टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य या योजनेत येत नाही, पण आम्ही तुमच्यासाठी ते साहित्य उपलब्ध करुन देतोत, परंतु यासाठी एवढे पैसे लागतील म्हणून अनेकांकडून हजारो रुपये उखळले जात आहेत. या टोळीला सुद्धा जेल मध्ये घालण्याची गरज आहे.