बीड ( प्रतिनिधी ) शासन आणि प्रशासन यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटली आहे. स्वातंत्र्यानंतर नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र मिळाले का ? हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी समाजात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. अँटी करप्शनच्या केसेस करणाऱ्या सर्व फिर्यादीने समाजात जागृती करण्यासाठी सातत्याने अग्रेसर रहावे, असे आवाहन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी ज्या फिर्यादीना लाच मागण्यात आली आहे, त्यांनी अँटिकरप्शन खात्यामार्फत आरोपींना गजाआड केले. अश्या सन २०२१ मध्ये केसेस करणाऱ्या सर्व फिर्यादी यांचा सत्कार भ्रष्टाचार विरोधी अभियान तर्फे करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना अँड. देशमुख यांनी समाजामध्ये भ्रष्टाचाराची लागलेली कीड रोखणे गरजेचे आहे. फिर्याद दाखल करून लाचखोर अधिकाऱ्यांना गजाआड केलेल्या सर्व फिर्यादीचे देखील अँड. देशमुख यांनी अभिनंदन केले. आणखी फिर्यादी पुढे आणण्यासाठी या फिर्यादीने सातत्याने प्रयत्न करावेत. लाचखोरांना पकडून देणे, हे राष्ट्रीय काम आहे. त्यामुळे आपण ते सातत्याने करावे. भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण होणे आवश्यक असल्याने प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिया काम करावे, असेही देशमुख यांनी यावेळी म्हटले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक श्री. भारत राऊत होते. तर हमाल मापाडी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजकुमार घायाळ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते किसन बाबुराव सावंत हे देखील उपस्थित होते. २०२१ या सालात ज्यांनी अँटिकरप्शन मध्ये आरोपी पकडले, त्या फिर्यादी यांना सन्मानपत्र, शाल, आणि पुष्पहार देऊन गौरवण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक बलभीम बजगुडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन मस्के यांनी केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात तीन फिर्यादीने आपापली मते मांडली. केसेस करण्यापूर्वी आणि केल्यानंतर कशा भूमिका निभावाव्या लागतात, याबद्दलही फिर्यादीने चांगल्या प्रकारचे मत व्यक्त केले