-कारवाई थांबविण्यासाठी अनेक संघटना, पदाधिकारी पुढे
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : वंचित बहुजन आघाडीचे माजी बीड जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर झालेली कारवाई जाणिवपुर्वक करण्यात आलेली असून माझा मुलगा समाजकार्यात चांगले काम करत आहे व राहील. यामुळे मुख्यमंत्री साहेब या प्रकरणाचा सखोल तपास करुन माझ्या मुलाला व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शिवराज बांगर यांचे वडील जनार्दन बांगर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा वंचित कामगार संघटनेचे प्रेदशाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर एमपीडीए (झोपडपट्टी दादा) अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर व गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक हनुमंत खेडकर यांच्या पथकाने शनिवारी सकाळी बेलापुर येथील लॉजवरुन शिवराज बांगर यांना ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी रात्री बीड येथे आणण्यात आले होते. यानंतर त्यांना औरंगाबाद येथील हर्सुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. यासर्व कारवाई नंतर शिवराज बांगर यांचे वडील जनार्दन बांगर यांनी माझ्या मुलावर झालेली कारवाई खोटी असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन माझ्या मुलाला व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
कारवाई थांबवण्याची मागणी…
वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर एमपीडीए अंतर्गत झालेल्या कारवाई नंतर ही कारवाई रोखण्यासाठी अनेक जणांनी पत्रक काढून ही कारवाई रोखण्याची मागणी केली आहे. काढलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की ही कारवाई चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. ही कारवाई जीवनाच्या नैसर्गिक हक्काविरुद्ध असून ही कारवाई थांबविण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश सुचिव के.के. वडमारे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर बहिर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक संगीता चव्हाण, छावाचे गंगाधार काळकुटे, डीपीआयचे अजिंक्य चांदणे, एएमआयएमचे शेख अमर, नगरसेविका जयश्री विधाते, लिंबागणेशच्या सरपंच निकीता गलधर, नगरसेवक विनोद मुळूक, भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर यांच्यासह इतरांनी केली आहे.