प्रारंभ वृत्तसेवा
बीड : आष्टी तालुक्यातील गहूखेल/वेलतुरी येथील ग्रामसेवक यांना 30 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी त्यांना एसीबीने आज ताब्यात घेतले. त्यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीच्या वतिने करण्यात आली.
ग्रामसेवक सय्यद शकील सय्यद (वय 46 रा.धामनगाव ता. आष्टी) यांनी वेलतुरी ग्राम पंचायत कार्यालयाच्या इमारतीचे दुरुस्तीचे केलेल्या कामाचे नेट पेमेंट चेक देण्यासाठी तक्रारदारांकडून 30 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराची पैसे द्यायची इच्छा नसल्यामुळे त्यांनी बीड येथील एसीबी कार्यालयाकडे तक्रार केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर येथील एसीबीने सापळा रचून सय्यद शकील सय्यद यांना 30 हजाराच्या लाच मागितल्या प्रकरणी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक भारत राऊत, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, श्रीराम गिराम, गणेश म्हेत्रे यांनी केली.