• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा निर्बंध; रात्री जमावबंदी!

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 24, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

 आज नवी नियमावली जाहिर होणार

प्रारंभ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रासह देशात करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे सावट गडद झाले असून, राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल.

गेल्या 24 तासांत मुंबईतील 602 जणांसह राज्यभरात 1179 करोनाबाधित आढळले. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री करोना तज्ज्ञ गटाशी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे चर्चा केली. त्यात दिल्लीच्या धर्तीवर निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, शुक्रवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असून, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे.

याबाबत शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पुन्हा करोना कृतीदलाशी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात येईल. या निर्बंधांनंतर आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून परिस्थितीनुसार निर्बंध कठोर करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

दुसरीकडे, करोना रुग्णसंख्येत दुसऱ्या दिवशीही वाढ नोंदविण्यात आली. राज्यात गुरुवारी करोनाचे 1179 रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील रुग्णवाढ  लक्षणीय आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 602 रुग्ण आढळले. मुंबईत बुधवारी 490 रुग्ण आढळले होते. दैनंदिन रुग्णसंख्येतील हा दोन महिन्यांतील उच्चांक होता. गुरुवारी त्यात मोठी भर पडली. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली असली तरी राज्याच्या अन्य भागात अजून तरी तेवढी वाढ झालेली नाही. दिवसभरात पुणे जिल्हा 184, नगर 44, मराठवाडा 27, विदर्भ 18 नवे रुग्ण आढळले. राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या 7,898 रुग्ण हे उपचाराधीन आहेत.

स्थानिक पातळीवर निर्बंध?

नाताळ आणि नववर्ष कार्यक्रमांवर ओमायक्रॉनचे सावट आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना केंद्र सरकारने गुरुवारी राज्यांना केली. मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळणारी ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावीत आणि करोनाबाधितांचे प्रमाण, रुग्णदुपटीचा दर यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. तसेच निवडणुका तोंडावर आलेल्या राज्यांत लसीकरण मोहिमेला वेग देण्याची सूचना केंद्राने केली.

मध्यप्रदेशमध्ये रात्रीची संचारबंदी

मध्य प्रदेश सरकारने रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ओमायक्रॉनबरोबरच करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केले.

चर्चमध्ये 50 टक्के उपस्थितीची मर्यादा

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर ख्रिस्ती बांधवांनी नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करत राज्याच्या गृहविभागाने चर्चमध्ये क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत उपस्थितीला परवानगी असेल, असे गुरुवारी स्पष्ट केले. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री आदी वस्तू ठेवल्या जातात. यावेळी अंतरनियमासह करोना नियमांचे पालन करावे, मिरवणूक काढू नये, गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे, मीरा-भाईंदरमध्येही शिरकाव

कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाणे महापालिका आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण गुरुवारी आढळला. ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे.

ओमायक्रॉनचे  23 नवे रुग्ण

राज्यात ओमायक्रॉनचे 23 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची ओमायक्रॉन रुग्णसंख्या 88 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांपैकी 16 हे आंतरराष्ट्रीय प्रवासी असून, सात जण हे त्यांच्या सहवासातील आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी सहाजण आखाती देश, चार जण युरोप, दक्षिण अफ्रिका आणि घाना प्रत्येकी दोन, सिंगापूर व टांझानियातून प्रवास केलेला प्रत्येकी एक जण ओमायक्रॉनबाधित आढळला आहे.

Previous Post

पाच हजार रेशनकार्ड गायब प्रकरण अधिकाऱ्यांवर शेकणार

Next Post

बीड शहरातील बायपास टू बायपास रस्ता कामास अखेर सुरूवात

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
बीड शहरातील बायपास टू बायपास रस्ता कामास अखेर सुरूवात

बीड शहरातील बायपास टू बायपास रस्ता कामास अखेर सुरूवात

कुंडलिक खांडे नंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा आयपीएस पंकज कुमावत यांचा दणका

कुंडलिक खांडे नंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा आयपीएस पंकज कुमावत यांचा दणका

माझा या क्लबशी कसलाही संबंध नाही — राजेंद्र मस्के

माझा या क्लबशी कसलाही संबंध नाही — राजेंद्र मस्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा