–अवैद्य वाळू तस्करी प्रकरणी पिंपळनेर पोलीसांची डोळेझाक
–पिंपळनेर परिसरातुन वाहणाऱ्या सिंदफणानदीतुन 24 तास वाळूचा उपसा
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : येथील पिंपळनेर परिसरातुन वाहणाऱ्या सिंदफणा नदीतुन गेल्या काही महिन्यापासून बेसुमार वाळूचा उपसा सुरु आहे. वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतुक सुरु असल्यामुळे यापरिसरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले असून खराब झालेल्या रस्त्यांमुळे येथील नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील वाळू तस्करी प्रकरणी मात्र पिंपळनेर पोलीस फक्त बघण्याची भुमिका घेताना दिसत आहेत. यामुळे या प्रकरणात पोलीस अधिक्षकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरीक करत आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाळूची बेसुमार उपसा होत आहे. यात बीड तालुका, माजगाव तालुका व गेवराई तालुके नेहमीच पुढे असतात. यात बीड तालुक्यातुन गोदावरी नदी जात नसली तरी, या तालुक्यातुन सिंदफणा नदी जाते. या नदीच्या पात्रातुन गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहे. यात पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त प्रमाणात वाळूची वाहतुक होत आहे. यात विशेष या परिसरातुन अवैद्य वाळूची वाहतुक करणाऱ्या वाहनांतुन क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतुक करण्यात येत आहे. यामुळे येथील परिसरात अनेक रस्ते खराब झालेले आहेत. यामुळे येथील खराब रस्त्यांमुळे येथील ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. 24 तास वाळूची वाहतुक सुरु असतानाही, याकडे मात्र पिंपळनेर पोलीस मात्र दुर्लक्ष करत आहेत.
एकही लिलाव नसताना वाळू उपसा कुणाच्या आदेशाने सुरु?
बीड जिल्ह्यात सध्या कुठेच एकही लिलाव घाट नाही, तरीही जिल्ह्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतुक करणारे वाहने सुरु आहेत. यात पिंपळनेर पोलीस ठाण्यात जास्त वाळू उपसा होत आहे. यात विशेष म्हणजे लिलावघाट नसतानाही सुरु असलेला वाळूचा उपसा कुणाच्या आदेशाने चालत आहे, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.