बीड प्रतिनिधी : आरोग्य खात्यातील विवीध पदासाठी शासनाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेण्यात आली होती.महाराष्ट्रातील अ तरन्रे गोरगरीब विद्यार्थ्यांनी परिक्षा फाॅर्म भरुन अथक परिश्रम करून परिक्षा दिली होती. पहिल्यांदा हाॅल टीकीटच नियोजन झालं नाही त्यामुळे एकदा परिक्षा रदद करण्यात आली. पुन्हा दुसर्यांदा परिक्षेच नियोजन झाल्यानंतर पुन्हा एकदा पेपर फोडण्याच महापाप काही लोकांनी केलेल आहे. अनेक विद्यार्थी स्ववताच्या भवितव्यासाठी अथक परिश्रम करतात. परंतु काही दलाल मंडळी जर पैसे घेऊन पेपर फोडुन जर सर्व सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही यांना सोडणार नाहीत. या सर्वपरिक्षा यद्द कराव्यात व पेपर फोडणार्यांघा तपास वरिष्ठ तपास यंत्रणेकडुन करुन दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करून गोरं गरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे यांनी दिला आहे.