प्रारंभ वृत्तसेवा
बीड : तत्कालीन जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर अवैध गुटखा प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर, त्याच्या पदाला स्थगिती देण्यात आली होती. यानंतर अनेक पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून होते. या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अखेर या पदावर एकाची निवड करण्यात आली असल्याची माहीती विश्वसनीय सुञांकडून मिळत आहे.
बीडचे शिवसेना जिल्हा प्रमख कुंडलिक खांडे यांच्यावर गुटखा प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर राज्यात शिवसेना पक्षाची मोठी बदनामी झाली होती. यापदावर वर्णी लागावी यासाठी, येथील आजी माजी पदाधिकारी मुंबईत तळ ठोकूण होते. यापदावर कुणाची वर्णी लागणार याकडे माञ जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. परंतु यापदावर योग्य उमेदवार देण्यासाठी मातोश्रीवरुन चाचपणी करण्यात आली होती. अखेर ही चाचपणी झाली असून यापदावर योग्य व्यक्तीची निवड करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सुञांकडून मिळत आहे. लवकरच या पदावर कुणाची निवड करण्यात आली आहे याची घोषणा होणार आहे. ज्याची निवड यापदावर झाली आहे तो योग्यच आहे अशी सुद्धा माहिती मिळत आहे.