बीड/प्रतिनिधी
बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्याचे अग्रणी नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर हे सातत्याने शहराच्या प्रश्नासाठी काम करत आहे पुढच्या पिढीचा विचार करूनच क्षीरसागर बंधू वाटचाल करत आहे शिवसेनेत त्यांना नक्कीच झुकते माप मिळेल जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे नगरपालिकेचे प्रश्न प्रलंबित आहेत या समस्या आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा खा अनिल देसाई यांनी केले आहे
बीड नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिलाई मशीन वाटप गरजू महिलांना साड्यांचे वाटप विद्यार्थ्यांना शालेय साहित्य फेरीवाल्यांसाठी कर्जवाटप महिला बचत गटातील धनादेश कर्ज मंजुरीचे पत्राचे वाटप आज शिवसेना नेते खासदार अनिल देसाई आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार बदामराव पंडित शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव युवनेते डॉ योगेश क्षीरसागर, दिनकर कदम,विलास बडगे,अरुण डाके,गणपत डोईफोडे, अरुण बोगाणे,कलंदर पठाण,माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप सचिन मुळूक उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर तसेच बाळासाहेब आंबुरे किसान सेनेचे परमेश्वर सातपुते महिला जिल्हाप्रमुख ऍड संगीता चव्हाण महिला बचत गटांना पाठबळ देणाऱ्या डॉ सारिका क्षीरसागर, बाळासाहेब पिंगळे यूद्धजीत पंडीत, गोरख शिंगण सुधाकर मिसाळ नितीन धांडे बप्पासाहेब घुगे सागर बहिर,सुनील सुरवसे, यांच्यासह नगरपालिकेचे सभापती व सर्व नगरसेवक उपस्थित होते तसेच शालिनी परदेशी,मनीषा स्वामी,नीता कांबळे,ललिता तांबारे, सलिया सय्यद,रेवती धिवार,राजू वंजारे,आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की स्वर्गीय काकू पासून समाजसेवेचे व्रत घेतले आहे शहरात महिला बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे आज बाराशे महिला बचत गट कार्यरत आहेत बचत गटाच्या माध्यमातून निवारा घर चालू आहे, शहरात महिला बचत गटांसाठी लवकरच मॉलची उभारणी करणार आहोत,आम्हाला गोर गरीबाचा आशीर्वाद आहे म्हणूनच 35 वर्षापासून नगराध्यक्ष आहे शहराच्या विकासासाठी आम्ही पुढेच असतो मात्र काहींनी भेट नगरपालिकेचा निधी पळविण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही गोष्ट घातली आहे तरीही कायदेशीर लढाई लढून आम्ही विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ 40 पेक्षा अधिक जागेवर पुन्हा एकदा विजय मिळवून बीड शहराच्या विकासासाठी जनतेचे सेवक म्हणून काम करू जनतेच्या कामासाठी आम्ही कधीच भेदभाव करत नाहीत राजकारणाच्या वेळी राजकारण आणि इतर वेळी समाजकारण करण्याचा पिंड आहे म्हणूनच जनता आमच्या पाठीशी असते असे सांगून त्यांनी शिवसेना नेत्यांना बीड नगरपालिकेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली
यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, देशात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत जो कायदा येणार होता या कायद्याला विरोध केला जात होता मात्र आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मागे घेतले आहेत आपण सत्तेत आहोत याची जाणीव होणे गरजेचे आहे, मात्र सध्या तशी परिस्थिती दिसत नाही, बीड जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न हे सुटणे गरजेचे आहे विजेच्या बाबतीत सरकारने शेतकऱ्यांना झुकते माप द्यायला हवे विजेच्या बाबतीत जाचक अटी रद्द करून विज बिल माफी केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, जनतेचे प्रश्न सोडवत असताना शस्त्र आणि पाठबळ मिळणे गरजेचे असते आम्ही सातत्याने मागण्या करत आहोत पक्षाने अशा जनहिताच्या मागण्यांची दखल घेणे गरजेचे आहे मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात चांगला निर्णय होतो आहे 100 कोटी रुपये मंजूर करून या कामाला आता सुरुवात झाली आहे मात्र या योजनेसाठी तेवीस हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या 23 हजार कोटींमध्ये आठ जिल्ह्याचे प्रश्न सुटणार आहे असे सांगून त्यांनी खासदार अनिल देसाई यांना लक्ष घालण्याची मागणी केली
यावेळी क्षीरसागर बंधूंच्या भाषणानंतर खा अनिल देसाई यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आक्रमक पणे आपले मनोगत व्यक्त केले बीड शहरात सध्या जी कामे चालू आहेत ती पुढचा विचार करूनच चालू आहेत, बीड शहराला कार्यसम्राट नगराध्यक्ष लाभले आहेत त्यांच्या मागण्या रास्तच आहे बीड जिल्हा हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे ज्या मागण्या केल्या गेल्या आहेत त्याला गती देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू मी स्वतः पुढाकार घेऊन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलणार आहे महिलांसाठी बीड नगरपालिकेने जे काम केले आहे ते अतुलनीय आहे, क्षीरसागर बंधूंनी केवळ बीडकरांचा हिताचाच विचार केलेला आहे, त्यांना जनतेने देखील पाठबळ देणे महत्त्वाचे आहे जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे बीड नगरपालिकेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे ते सोडवण्यासाठी आपण नक्कीच पुढाकार घेऊ शिवसेनेत काम करणाऱ्याला झुकते माप दिले जाते असे सांगून त्यांनी बीड शहराचे प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले,यावेळी बचत गटाच्या महिला कार्यकर्ते उपस्थित होते