एक कोटी पेक्षा जास्त किमतीचे ७५ हजार लिटर बायो डिझेल जप्त
प्रारंभ न्युज
बीड : केज विभागात दाखल झाल्यानंतर दोन नंबरवाल्यांना चांगली धास्ती भरवणारे आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांनी अनेक बेधडक कारवाया सुरु केले आहेत. आज त्यांनी तब्बल एक कोटी पैक्षा जास्त किमतीचे ७५ हजार लिटर बायो डिझेल जप्त करत चार जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहेत. पंकज कुमावत जिल्ह्यात चांगले काम करत आहे.
आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या टिमला खबर्यामार्फत माहिती मिळाली होती, याअनुषंगाने पंकज कुमावत यांच्या टिमने मुंबई, पुणे येथून केज मार्गे बायोडिझेल घेऊन जाणारे चार टॅंकरसाठी पकडण्यासाठी सापळा रचला होता. यावेळी केज तालुक्यातील मस्साजोग याापरिसरात यााटिमने एक टॅंकर ताब्यात घेतले. यावेळी टॅंकर चालकाला विचारपुस केली असती इतर टॅंकर पुढे नांदेडकडे जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पंकज कुमावत यांनी नांदेड गाठले. यावेळी त्यांनी एकूण तीन टॅंकर ताब्यात घेतले क्र.एमएच ४६ जेइ ११०६, एमएच ०४ जीएफ ९८७३, एमएच २६ एच ८४९६ व एक स्काॅर्पिओ एमएच २१ एएक्स १३५६ एक कार एमएच २६ टि ९९९९ ही वाहने जप्त केली. यासह तीन टॅंकर मधील ७५ हजार लिटर बायोडिझेल सुद्धा जप्त केले. या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई आयपीएस अधिकारी पंकज कुमावत, बाबबासाहेब बांगर, विकास चोपणे, सुहास जाधव यांनी केली