बीड/प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील अत्याचारीत अल्पवयीन मुलीच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दीली.आज सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे, मनीषा तोकले यांनी माजीमंत्री क्षीरसागर यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली
मानव अधिकार आंदोलन व महीला किसान अधिकार मंचच्या नेत्या मनिषा तोकले यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन अंबाजोगाई येथील पिडीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासंबंधी सविस्तर माहिती दीली. त्या मुलींची आई तिच्या लहानपणीच वारली आहे. तिच्या चुलत्याने तिचा बालविवाह केला आहे. नवर्या नेहमी तिच्यावर अल्पवयात लैंगिक व शारीरिक अत्याचार केले या अत्याचाराला कंटाळून ती मुलगी माहेरी आली तर तिच्या वडिलांनी ही तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर सदर मुलीने घर सोडले व अंबाजोगाई च्या रस्त्यावर सहा महीने गुजरान केली. या सहा महीन्याच्या काळात अनेक नराधमांनी तिच्या ईज्जतीचे लचके तोडले. ही माहिती देवून.पुढील मागण्या केल्या. ते दोन पोलिस तपास कामात अडथळा निर्माण करू शकतात किंवा तपासाला वेगळी कलाटणी देवू शकतात, कींवा तपासातील मुद्देमाल नष्ट करू शकतात म्हणून त्या दोन पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांना अटक करावी.
सदरील अल्पवयीन मुलीला शरीर विक्रय करण्यास भाग पाडणार्या आरोपिवर पिठा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्या अल्पवयीन मुलीच्या संरक्षणाची व पुनर्वसनाची काळजी महाराष्ट्र शासनाने घ्यावी.
या प्रकरणी तपासकार्यात स्वतंत्र पथक नेमून तपास करावा.
या मागण्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मनिषा तोकले यांनी निवेदन देऊन केल्या आहेत. अत्याचारीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार ही खूप वाईट घटना आहे. सदर अत्याचारीत अल्पवयीन मुलीच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दीली.