अखेर शिवसनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंवर गुन्हा नोंद
पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांची धाडसी कारवाई; वर्दीची लाज राखणारा अधिकारी
प्रारंभच्या दणक्याने अवैद्य गुटखा प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : हा गुटखा कुंडलिक खांडेचा आहे असे सांगा पोलीसांना व येथून जा म्हणावे, असे बोलून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी संबंधित व्यक्तीला लावलेला फोन ठेवून दिला. परंतु वर्दी काय असते हे आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांनी दाखवून दिले. कोणाच्याही दबावाला बळी न पडता सत्ताधारी पक्षातील जिल्हा प्रमुखावर अखेर आज (ता. 17) त्यांनी अवैद्य गुटखा प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैद्य धंद्यात सत्ताधारी पक्षाचे प्रमुख सक्रीय असल्याची बातमी प्रारंभने प्रकाशीत केल्यानंतर आता कुठे पोलीस प्रशासन सक्रीय झाले असून मंगळवार (ता. 16) बीड परिसरात झालेल्या कारवाईत 25 ते 30 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी आज (ता. 17) केज पोलीस ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाई मुळे सत्ताधारी नेतेच अवैद्यधंद्यात सक्रीय असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री साहेब जर तुमचे जिल्हाप्रमुख अशी कामे करत असतील तर इतरांचे काय अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दोन नंबरचे धंदे जोरात सुरु असून या धंद्यात सत्ताधारी पक्षातीलच नेते सक्रिय असल्याची बातमी प्रारंभने गेल्या पंधरा दिवसापासून केली होती. त्याचीच दखल घेऊन पोलीस प्रशासन आता कारवाया करत आहे. काल बीड तालुक्यातील काही ठिकाणी धाडी टाकून जवळपास 25 ते 30 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकारणी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह इतर तीन जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांना चांगला धडा मिळाला आहे.
येथील संबंधित पोलीस शांत का?
बीड तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून गुटखा व इतर धंदे सुरु आहेत. तरीही येथील पोलीस कारवाया का करत नाहीत. जी कारवाई आयपीएस अधिकारी पंकज कुमावत करु शकतात तर येथील पोलीस काय करु शकत नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.