बीड प्रतिनिधी :
बीड जिल्हारूग्णालयातील अनागोंदी कारभार तसेच ५९ कोटी रूपये,औषध खरेदी घोटाळा, विविध खरेदी कागदोपत्रीच दाखवून अपहार आदि प्रकरणात तक्रारी असतानाच जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी बीड जिल्हा रूग्णालयात राऊंड चालु असतानाच दोन वर्षापुर्वी बडतर्फ केलेले रतन जायभाये यांनी ५०० जम्बो सिलेंडर खरेदीत प्रकरणातील कागदपत्रावर छातीवर कागद ठेऊन स्वाक्षरी केल्याचा फोटो दैनिक पुण्यनगरीत झळकला होता ,बडतर्फ कर्मचा-यांचा जिल्हारूग्णालयाच्या प्रशासकीय कामात हस्तक्षेप हा कळीचा मुद्दा होता.
बीड जिल्हा रूग्णालयातील आरोग्य विभागाला दिलेल्या ५९ कोटी रूपयांच्या विविध खरेदीमध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला असून जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी बडतर्फ कर्मचारी राजरतन जायभाये यांना जिल्हा रूग्णालयाचा राऊंड घेताना ५०० जम्बो सिलेंडर खरेदी कागदपत्रावरील सहीसह औषध निर्माण आधिकारी आदिनाथ मुंडे यांच्यासह भांडार शाखेतील खरेदी गैरव्यवहार प्रकरणात स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वरील प्रकरणात जिल्हा आरोग्य आधिकारी बीड यांना चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारास परस्पर कळविण्याचे आदेश दिलेले आहेत, वरील प्रकरणात जिल्हा आरोग्य आधिकारी यांना जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड तसेच बीड जिल्हा रूग्णालयातील गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करण्याचे आधिकारच नाहीत.
आरोग्य संचालकांचे उपसंचालक डाॅ.एकनाथ माले यांना चौकशीचे आदेश, डाॅ.मालेचे नेहमीप्रमाणेच भ्रष्टाचाराची पाठराखण
वरील प्रकरणात आरोग्य संचालक यांनी उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर डाॅ.एकनाथ माले यांना चौकशी करून वस्तुनिष्ठ माहीती आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह, स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर करण्यास सांगितली होती परंतु नेहमीप्रमाणेच डाॅ.एकनाथ माले यांनी दिड महिना उलटुन गेला तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.