जलसंधारण मंत्री शंकरराव गढाख यांनी निधी मंजुर करून सर्व्हेक्षणाचे दिले निर्देश
आ.संदिप क्षीरसागर यांचा पाठपुरावा
बीड (प्रतिनिधी):- बीड विधासभा मतदार संघातील शिरूर कासार तालुक्यातील डिसलेवाडी साठवण तलावाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या तलावाच्या कामास मेरी नाशिककडून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले असून प्रकल्प स्थळाचे सर्व्हेक्षण करून अंदाज पत्रक तयार करण्याचे निर्देश आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीवरून जलसंधारण मंत्री शंकरराव गढाख यांनी दिले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला डिसलेवाडी साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
डिसलेवाडी ता.शिरूर कासार साठवण तलावास मंजुरी देवून निधी देण्यता यावा अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर गेल्या दोन वर्षापासून करत असून यातील तांत्रिक अडचणी दूर करत सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पाला त्यांनी मेरी नाशिककडून पाणी उपलब्धता प्रमाणपत्रही मिळवून घेतले. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदर तलावाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे या मागणीसाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गढाख यांची भेट घेवून मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित साहेब देखिल उपस्थित होतेे. सदरील साठवण तलाव पुर्ण झाल्यास शिरूर कासार तालुक्यातील बीड मतदार संघातील 700 हेक्टर जमीन सिंचनाखाली येवून शेतकर्यांच्या दृष्टीने मोठे विकास काम होवू शकेल. या संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीवरून जलसंधारण मंत्री शंकरराव गढाख यांनी तातडीने सर्व्हेक्षण करून अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागणार आहे. सदर काम पुर्णपणे जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत माझा सातत्याने पाठपुरावा सुरू राहिल असे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
*सातशेपक्षा जास्त हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार!*
डिसल्याचीवाडी साठवण तलाव कामास मंजुरी देवून तातडीने काम हाती घेण्यात यावे यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर सातत्याने पाठपुरावा करून मंत्री, प्रशासन यांच्या संपर्कात आहेत. याचे सर्व्हेक्षण आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश मंत्री महोदय यांच्याकडून देण्यात आले आहेत. सदर साठवण तलाव पुर्ण झाल्यास या भागातील 700 हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली येवून शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.