राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लागलेत आणि केवळ आर्यन खान महत्त्वाचा असल्यासारखे दिवसरात्र त्याची टिमकी मिरवणारे हे आघाडी सरकार
प्रारंभ । वृत्तसेवा
आष्टी तालुक्यातील आष्टा ह.ना.व टाकळसिंग महसूल मंडळ अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित असल्यामुळे आज आ.सुरेश धस यांच्या उपस्थितीत चिंचपूर ता.आष्टी येथील राष्ट्रीय महामार्गावर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आ.सुरेश धस यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह राज्यसरकारवर निषाणा साधला. गोरगरिबांचे दिवाळे काढून पालकमंत्री दिवाळीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
आष्टी तालुक्यातील आष्टा ह.ना.व टाकळसिंग या मंडळांना अद्यापही अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही यामुळे आज आ.सुरेश धस यांनी रस्तारोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या 33 आत्महत्या झाल्या, त्यांचे सांत्वन करायला या सरकारकडे वेळ नाही, राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लागले व आर्यन खान महत्त्वाचा असल्यासारखं वागत आहे. केवळ सकाळ, दुपार, संध्याकाळ टीव्हीसमोर चमकोगिरी करण्याचे काम हे तिघाडी सरकार करतेय, गोरगरीबांचे दिवाळं काढून पालकमंत्री दिवाळी साजरी करण्यात व्यस्तय. यासह इतर मुद्दे उपस्थित करत आ.सुरेश धस यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे व राज्य सरकारवर निषाणा साधला. चक्काजाम आंदोलनावेळी येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
p