प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले व खासदार सौ.रजनीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती
कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे-जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांचे आवाहन
अंबाजोगाई : बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार,दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता अंबाजोगाईत आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले व खासदार सौ.रजनीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तरी मेळाव्यास पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,एॅड.माधव जाधव,उपाध्यक्ष राहुल सोनवणे,हणमंतराव मोरे,पशुपतीनाथ दांगट यांनी केले आहे.
अंबाजोगाईत आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले तर मेळाव्याचे उद्घाटन खासदार सौ.रजनीताई अशोकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल.याप्रसंगी विचारमंचावर माजी मंञी अशोकराव पाटील,ज्येष्ठ नेते बाबुरावजी मुंडे,जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,किसान काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष एॅड.माधव जाधव,आदित्य पाटील,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस अनिलराव मुंडे,महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.मिनाक्षीताई पांडुळे पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे,हणमंतराव मोरे,नवनाथराव थोटे,एॅड.अनंतराव जगतकर,वसंतराव मोरे,तारेखअली उस्मानी,सय्यद बहाद्दूर ऊर्फ हनिफ,पशुपतीनाथ दांगट,जुबेरभाई चाऊस आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांसह नेते उपस्थित राहणार आहेत.काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे.रविवार,दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परीसरातील हेलिपॅडवर मान्यवर नेत्यांचे हेलिकॉप्टरमधून आगमन होईल.त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या “जिल्हा काँग्रेस भवन” या संपर्क कार्यालयाचे मान्यवर नेत्यांचे हस्ते उद्घाटन होईल.त्यानंतर दुचाकी व चारचाकी वाहनांची भव्य रॅली लोकनेते यशवंतराव चव्हाण चौक-माता रमाई आंबेडकर चौक-शासकीय विश्रामगृह-नवा मोंढा-छञपती शिवाजी महाराज चौक-बस स्थानक ते अंबाजोगाई नगरपरिषद परीसर अशी काढण्यात येईल.या रॅलीचा समारोप आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात होईल.सकाळी साडेदहा वाजता कार्यकर्ता मेळावा सुरू होईल.अंबाजोगाईत आयोजित कार्यकर्ता मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी बीड,गेवराई,आष्टी-पाटोदा-शिरूर,माजलगाव,वडवणी,धारूर,केज,परळी,अंबाजोगाई येथील काँग्रेस पक्षाचे आजी,माजी पदाधिकारी,नगरसेवक,बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष,आजी माजी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया,इंटक आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला आहे.