आ.विनायकराव मेटे यांची ना.नितीन गडकरी यांच्या समवेतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा संपन्न
बीड प्रतिनिधी : बीडकरांसाठी सध्या अत्यंत लाजीरवाणी बाब कुठली असेल तर ती बीड शहरातून गेलेल्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची आणि धूळ खात पडलेला बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवर पुल कम बंधारा प्रस्तावाची आहे.बिंदुसरा नदीवरील असणारे प्रकल्प पाण्याने पुर्ण क्षमतेने भल्यानंतर मोठया प्रमाणावर पाणी वाहुन जात आहे. बीड जिल्हयात सतत पडणाऱ्या दुष्काळात पाण्याची समस्या निर्माण होते म्हणुन वाढत्या रहदारीचा व पाण्याचा प्रश्न लक्षात घेता बिंदुसरा नदीवर पुलकम बंधारा तात्काळ होणे अपेक्षित आहे.या दोन्ही बाबी एवढ्या बाईट अवस्थेत आहेत की,यामुळे जनतेने निवडून दिलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधीं व अनेक वर्षे सत्ता उपभोगणार्या नेत्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे, हे रस्ते दुरुस्त केले नाही तर अनेक अप्रिय घटना घडू शकतात तशा घटनांची वाट न बघता व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आ.विनायकरावजी मेटे यांनी विविध महामार्ग व रस्ते कामांना मंजूरी व निधी उपलबधतेसाठी तसेच आगामी महानगरपालिका,नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली.
आ.विनायकराव मेटे यांनी विविध पाच कामांना मंजूरीसाठीचे पत्र मा. नितीनजी गडकरींकडे सोपविली. त्यावर दोघांमध्ये दिर्घकाळ सविस्तर चर्चा झाली. सर्व मागण्या वाचल्यानंतर गडकरी यांनी यातील चार कामे मार्गी लावतो असा, शब्द दिला.आ.मेटे यांनी खर्डा – चौसाळा – साळेगाव – अंबाजोगाई – परळी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जोन्नती करावी, बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवर पुल कम बंधारा मंजूर करावा, धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड बाह्यवळण रस्त्याला स्लीप रोड बांधावेत व म्हाळजवळा – जरूड – बोरफडी – येळंब – चौसाळा हा प्रमुख जिल्हा मार्ग केंद्रीय मार्ग निधीतून मंजूर करावा, अशा पाच मागण्या केल्या.
अतिवृष्टीनं मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. ढगफुटी सद्रश्य पावसाने शेती पिकासह रस्ते, नाले, पूर्व घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पशुधनही पुरात वाहून गेले.बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहितीही चर्चेदरम्यान आ. मेटे यांनी गडकरी यांना दिली.तसेच यावेळी महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय पद्धतीने कामकाज करत आहे, महत्त्वाच्या विषयावर वेळेत निर्णय न घेतल्यामुळे राज्यात किती बिकट अवस्था निर्माण झाली आहे, अजूनही शेतकऱ्यांना सरसकट मदत या सरकारने जाहीर केली नाही याबाबतही आ. मेटे यांनी मा. नितीनजी गडकरी यांना अवगत करून दिले.भारतीय जनता पार्टी कडे शिवसंग्राम मोठ्या भावाच्या भूमिकेत पहात आहे.अनेक महत्त्वाच्या विषयात तसेच आंदोलनात आघाडी सरकारच्या विरोधात शिवसंग्राम खांद्याला खांदा लावून गेल्या अनेक वर्ष भाजप सोबत उभा आहे तसेच आगामी पंचायत समिती नगर परिषद व नगरपालिका निवडणुकी बाबतही सकारात्मक चर्चा यावेळी उभयतांत झाली. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीबाबतीत व रस्ते कामांना मंजूरी व निधी उपलबधतेसाठी मदत करण्याचे आश्वासन यावेळी मा. नितीनजी गडकरी यांनी दिले.