महिला आयोग, विरोधक चिडीचुप; सर्व सामान्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी कायद्याच्या रक्षकांनी आप-आपले कामे प्रामणिकपणे पार पाडण्याची गरज!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : कायदा हा सर्वांसाठीच सारखा असतो, परंतु गेल्या काही वर्षापासून काही लोकांकडून याचा गैरवापर होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यात परळी येथील करुणा शर्मा हे प्रकरण नुकतेच घडले आहे. यात कुठे तरी पोलीसांचा हलगर्जीपणा होत असल्याचे दिसत आहे. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. एक महिला पत्रकार परिषद घेण्यासाठी परळी याठिकाणी येते, त्या ठिकाणी आल्यानंतर त्या महिलेला विरोध होतो, या दरम्यान अनेक प्रकार त्या ठिकाणी घडतात. यात विशेष म्हणजे ह्या सर्व घडामोडी पोलीस प्रशासनाच्या समोर घडलेल्या आहेत. तरीपण पोलीसांना करुणा शर्मा यांच्या वाहनात काहीतरी ठेवणारी व्यक्ती अजून सापडत नाही? हे सर्व सामान्यांना जरा वेगळेच चित्र वाटत आहे. यामुळे या प्रकरणात वरिष्टांनी योग्य ते लक्ष देऊन या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा देण्याची गरज आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला चांगल्या प्रकारे संविधान दिले आहे. यामुळेच आज सर्वसामान्यांना त्यांचे अधिकारी प्राप्त झालेले आहेत. परंतु ही घटना चालवणारे जर चांगले नसतील तर मात्र ही घटना प्रभावी ठरणार नाही असे मत त्यावेळेच डॉ. बाबासाहेबांनी व्यक्त केले होते. व सध्या तसेच चित्र निर्माण होऊ लागले आहे. येथील काही लोकांकडून याच घटनेचा चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे. सत्ता हातात आल्यानंतर आपल्या सोयीनुसार त्या सत्तेचा गैरवापर करताना अनेक जण दिसत आहेत. त्याच प्रकारे परळी येथील करुणा शर्मा प्रकरणात सुद्धा कुठे तरी सत्तेचा गैरवापर झाल्याचे दिसून येत आहे. यात पोलीसांची भुमिका दबावापोटी किंवा इतर कारणास्तव संशयास्पद दिसून येत आहे. यामुळे या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष देऊन खरे काय आहे ते जनतेसमोर आणण्याची गरज आहे.
महिला संघटना, महिला आयोग, विरोधक गप्पा का?
एखाद्या ठिकाणी अन्याय झाला किंवा सत्तेचा गैरवापर झाला तर त्याठिकाणी अनेक संघटना, महिला आयोग, विरोधक आवाज उठवत असतात. परंतु परळीच्या सर्वांना सत्ते माहित असून सुद्धा कुणीच आवाज उठवत नाही, याच प्रकारणात सर्व गप्पा काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.