0 ते 5 वर्ष वयोगटातील एक लाख 76 हजार मुलांचा सर्व्हे; कुपोषित मुलांसाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांच्या सर्व्हेमध्ये 511 कुपोषित बालके आढळून आली आहेत. तर मध्यम कुपोषित बालकांमध्ये दोन हजार 44 बालके आढळली आहेत. एकूण एक लाख 76 हजार 174 मुलांचा सर्व्हे आता पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत करण्यात आला आहे. जिल्हा विकासापासून दूर असला तरी या जिल्ह्यात मात्र दिग्गज नेते आहेत. यामुळे दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यात एवढा मोठ्या प्रमाणात कुपोषित बालके असल्यामुळे ही बाबा खुपच लाजीरवाणी वाटत आहे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांसाठी जिल्हास्थरावर विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.
बाल कल्याण विभागाच्या माध्यमातुन राज्यातील महिला व नवजात बालकांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असतात. परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळात या विभागामार्फत म्हणावे असे काम झालेले दिसत नाही. यामुळे आज जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बीड जिल्ह्यात 511 कुपोषित बालके तर दोन हजार 44 मध्यम कुपोषित बालके आढळून आलेले आहेत. ही आकडेवारी जिल्ह्यासाठी खुप मोठी आहे. तालुक्यांचा विचार केला तर बीड तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 92 कुपोषित बालके आढळली आहेत. या पाठोपाठा अंबाजोगाई तालुक्यात 88 कुपोषित बालके आहेत. इतर तालुक्यात सुद्धा कमी जास्त प्रमाण असल्याचे आकड्यावरुन दिसत आहे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासह येथील सत्ताधारी नेत्यांनी सुद्धा या बालकांसाठी पुढे येण्याची गरज आहे.
आम्ही केलेल्या सर्व्हेत 511 कुपोषित बालके आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला सोबत घेऊन या बालकांसाठी आम्ही विशेष मोहिम राबवत आहोत. त्यांना पोष्टिक आहारासह उपचार केले जात आहेत. श्री. चंद्रशेखर केकान, बाल कल्याण विभाग. बीड
चौकट
कुपोषित बालकांची तालुका निहाय्य आकडेवारी
तालुका कुपोषित बालके
-बीड -92
-अंबाजोगाई -88
-शिरुर -75
-केज -54
-आष्टी -53
-गेवराई -49
-माजलगाव -43
-वडवणी -21
-परळी -18
-धारुर -12
-पाटोदा -06
एकूण –511