आ. विनायक मेटे यांच्या मागणीची दाखल घेत ना. अजित पवार यांनी लावली बैठक
बीड (प्रतिनिधी ) श्री क्षेत्र नारायण गड हे जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या गडाला बीड जिल्ह्याची धाकली पांढरी म्हणून देखील मोठे महत्व आहे. त्याच बरोबर बिंदुसरा नदीवरील बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आ. विनायकराव मेटे यांनी राज्याचे उमुख्यमंत्री मा.ना. अजित पवार यांना ७ मे आणि ९ जून २०२१ रोजी रीतसर पत्र व्यवहार करून बैठकीचे आयोजन करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर ना. अजित पवार यांनी दी. ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४:०० वाजता मंत्रालयातील आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे.
बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड हे असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असून या गडाला धाकली पांढरी महणून मोठे महत्व आहे. या देवस्थानाच्या विकासासाठी मागील सरकारने २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देते ३ कोटी रुपये निधी वितरित देखल करण्यात आला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर घोषण करण्यात आल्या मात्र एक रुपया ही देण्यात आला नाही. तसेच सद्या बीड शहरला १२ ते १५ दिवसाला पाणी पुरवठा होतो. बीड शहराच्या मधोमध वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवर बंधारा बांधल्यास पाण्याचे सिंचन होऊन याचा बीडकराना मोठा फायदा होईल . या करिता आपण या विषयी बैठक आयोजित करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. विनायकराव मेटे यांनी ना.अजित पवार यांच्या कडे केली होती या मागणीची दखल घेत आज दि. ७ सप्टेंबर रोजी मंत्रलाय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या सोबत वेळोवेळी पाठपुरावा करून बिंदुसरा नदीवरील पुलाचे काम व बंधारा व्हावा या साठी प्रयत्न केले परंतु नगर पालिकेच्या पाईपलाईन च्या आडकाठी धोरणामुळे हा बंधारा होऊ शकला नाही. परंतु बीड शहरातील नागरिकांची अडचण दूर व्हावी यासाठी पुल तत्काळ करण्यात आला. आज होणाऱ्या या बैठकीतून नारायण गडाच्या भक्तांना आणि बीड शहवासीयांना काहीतरी ठोस निर्णय मिळेल असा विश्वास आ. मेटे यांनी या वेळी व्यक्त केला.