32 हजार 492 कोटीचा अतिकर वसूल केला आहे
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : कोव्हीड मध्ये दोन्ही सरकारने इंधनावर अतिकर लावत सर्वसामान्यांची पिळवणूक केल्याचे काम केले आहे. अनेक वेळा सर्वसामान्यांतून विरोध झाला असला तरी याकडे दुर्लक्ष करण्याचे काम सरकारने केले आहे. चालू आर्थिक वर्षात केेंद्र सरकारने इंधनावर एक लाख कोटी रुपये कमवल्याची माहिती उघड झाली आहे. राज्य सरकारने सुद्धा इंधनावर जास्त कर आकरलेले असल्यामुळे राज्य सरकारने सुद्धा जास्त वसूली केली असणार यात शंका नाही.
कोरोनामुळे एक तर सर्वसामान्य वर्ग त्रस्त असताना त्यात केेंद्र व राज्य सरकारने इंधनावर मोठ्या प्रमाणात कर लावलेला आहे. सरकारने गेल्या वर्षी पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी 19.98 रुपयांनी वाढवून 32.09 रुपये केली. त्याच बरोबर सरकार डिझेलवर प्रतिलिटर 31.80 रुपये उत्पादन शुल्क आकरते. यामुळे दोन्ही सरकारला इंधनातुन मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. चालू वर्षी म्हणजे एप्रिल 2021 ते जुलै 2021 या चार महिन्यात केंद्र सरकारला इंधनातुन एक लाख कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती उघड झाली आहे. यासह राज्य सरकारला सुद्धा एवढीच रक्कम मिळत असावी.