22 वर्षानंतर प्रथमच कडी नदीला महापूर
आष्टी (प्रतिनिधी) कडा शहराला पाणीपुरवठा करणारा देविनिमगाव-लिंबोडी तलाव शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शंभर टक्के भरला असुन त्यामुळे कडी नदीला मोठा पूर आला आहे.या पाण्यामुळे कडेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून नदी खळखळ वाहू लागली.रविवारी सकाळी आ.सुरेश धस यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरीही कडा व परिसरात जोरदार पाऊस नसल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु गत आठवड्यात धामणगाव परिसरात व निंबोडी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने देविनिमगाव निंबोडी प्रकल्प काठोकाठ भरला असून याद्वारे पाणी वाहू लागले आहे हे पाणी कडी नदीला येत असून ती आता खळखळ वाहू लागली आहे. याचा आनंद समस्त ग्रामस्थांना झाला असून आ.सुरेश धस यांच्या हस्ते पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ.धस म्हणाले की,१९९८ नंतर बावीस वर्षानंतर कडा नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून यामुळे शेतकरी वर्ग सुखावला जाणार आहे.नाम फौंडेशन, मानवलोक संस्था अंबाजोगाई व लोक सहभागातून एप्रिल व मे महिन्यात नदी खोलीकरण सुशोभीकरण व दुतर्फा भराव टाकणे, सफाई व रुंदीकरणाची काम पूर्ण केल्याने कडा शहरात पाणी शिरले नाही.तरीही नदीकाठच्या लोकांनी सावध राहण्याचे आवाहन आ.धस यांनी केले.
या प्रसंगी तहसीलदार राजाभाऊ कदम,नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे,सरपंच अनिल ढोबळे,उपसरपंच संपत कर्डीले,संभाजी कर्डिले , ग्रामसेवक आबासाहेब खिलारे,ग्रा पं सदस्य ,परमेश्वर कर्डिले, रमेश देशमुख ,अन्सार सय्यद,संजय ढोबळे,रमजान तांबोळी,संपत सांगळे,बाळासाहेब कर्डीले, अनिल शिंदे,श्रीपाद धुमाळ,शंकर देशमुख,राजाबापू कर्डीले, भाऊसाहेब भोजने,गोकुळ कर्डीले, गोरख कर्डीले, राजू गावडे,सदानंद देवा जोशी,युवराज खिलारे,संजय पवळ, उद्धव कर्डीले, पांडुरंग चौधरी,संपत नलावडे,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ कर्डीले,पत्रकार नितीन कांबळे,पत्रकार प्रवीण पोकळे,संजय खंडागळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.