प्रारंभ वृत्तसेवा
बीड : हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजानूसार बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्री झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची नोंद झाली आहे. अनेक नद्यांना पूर आला असून जिल्ह्यातील पाणीसाठ्या मोठी वाढ होणार आहे. तर दुसरीकडे जोमात आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामुळे एकीकडे दिलासा तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
बीड जिल्ह्यात पावसाचे अडीच महिने संपले तरी येथील पाणी साठ्यात मोठी कमी होती. यामुळे जिल्ह्याला मोठ्या पावसांची प्रतिक्षा कायम होती. परंतु रात्री झालेल्या पावसाने जिल्ह्यातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे. यासह अजून दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रात्री झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.