प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात ज्या प्रकारे विकास कामे होणे गरजेचे आहे, तशी कामे सध्या बीड जिल्ह्यात होताना दिसत नाहीत. यासह आम्ही सत्तेत असताना विकास कामांना जास्त महत्व देत जिल्ह्यातील दोन नंबरे धंदे बंद केले होते परंतु सध्या जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे चालु आहेत. तसेच सध्या जिल्ह्यात माफियाराज सुरु असल्याचे मत राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.
बीड जिल्ह्याचा विकास गतीने व्हावा यासाठी कुणीच पुढे येताना दिसत नाही. यामुळे जिल्ह्यात विविध समस्या निर्माण झालेले आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. काल राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीस मुलाखत देताना विविध विषयांना हात घातला. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील विकासाबाबत सुद्धा आपले मत व्यक्त केले. ज्या प्रकारे बीड जिल्ह्याचा विकास होणे गरजेचे आहे. त्या प्रकारे बीडचा विकास होताना दिसत नाही. सध्या बीड जिल्ह्यात वाळू माफिया यासह इतर दोन नंबरचे धंदे सुरु असल्यामुळे जिल्ह्यात फक्त माफियाराज सुरु असल्याचे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.