अंबाजोगाईत काळ्या फिती लावून निदर्शने
अंबाजोगाई प्रतिनिधी : शासनाच्या बदली धोरणाच्या विरोधात परिचारिकांनी मंगळवार दि 10 ऑगस्ट रोजी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करुन महाराष्ट्र शासनाचा निषेध केला.
बदलीचे अधिनियम 2005 च्या अधिन राहुन परिचारिकांच्या बदल्या करण्याचे संचालनालयाच्या विचाराधीन आहे.या बदल्या परिचारीका संवर्गासाठी अन्यायकारक असल्याचे परिचारिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. परिचारीकांच्या रुग्णालयाच्या अंतर्गत विभागीय म्हणजे एका कक्षातून दुस कक्षात बदल्या नियमितपणे केल्या जातात. जेथे अशा विभागीय बदल्या होत नसतील तेथे अंतर्गत बदल्याचे धोरण सक्तीने राबवावे, जेणेकरून इतरत्र होणाऱ्या बदल्यांनी कौटुंबीक त्रास,मुलांचे शिक्षण,वयस्कर सासु सासरे,आई वडील यांचे संगोपन व कुंटुब विस्कळीत होणे या सारख्या समस्याचा सामना करावा लागेल.
परिचारिकांचे पद हे सेवेचे पद असून कोणतेच आर्थिक व्यवहार या पदाच्या मदुमातून होत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी बनवलेला बदली नियम 2005 मअधून परिचारीकाना वगळण्यात यावे.
कोरोना महामारी अजून संपलेली नसुन तिसरी लाट (बेल्टा प्लस) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महामारीत इमान इतबारे काम करणाऱ्या परिचारिकांच्या अशा बदल्या केल्यास या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहणाऱ्या परिचारिकांचे मानसिक खच्चीकरण होईल.करीता शासनाने सदरील मुद्दयांचा विचार करावा.संघटनेला विचारात घेतल्याशिवाय कोणतीही बदली करू नये.याकरिता आज मंगळवार रोजी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासमोर परिचारीकानी काळ्या फिती लावून निदर्शने व निषेध व्यक्त केला.न्याय न मिळाल्यास नाविलाजास्तव संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन पुकारले जाहिल असा इशारा परिचारिकांच्या वतीने देण्यात आला.यावेळी परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.