कै.अण्णासाहेब पाटील स्मारक समितीची बैठक संपन्न
बीड प्रतिनिधी
कै.अण्णासाहेब पाटील यांचे भव्य स्मारक बीडमध्ये उभारण्यासाठी मी तुमच्या सोबत असून जिथे जिथे हे स्मारक उभारण्यासाठी अडचणी येतील तिथे तिथे तुमच्या सोबत राहून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगत अ.संदीप क्षीरसागर यांनी कै.अण्णासाहेब पाटीलांचा पुर्णाकृती पुतळा बीड पंचायत समितीत उभारणार असल्याचे आश्वासन कै.अण्णासाहेब पाटील स्मारक समितीच्या पदाधिकार्यांना दिले.
बीडमध्ये कै.अण्णासाहेब पाटील यांचे स्मारक उभे करण्यात यावे यासाठी समिती स्थापन असून या समितीचे अध्यक्ष रवी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीला मराठा समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये अण्णासाहेबांचे स्मारक उभारण्याबाबत चर्चा झाली. पुर्णाकृती पुतळ्यासह स्मारक उभारून अण्णासाहेबांच्या कार्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, हे स्मारक बीडमध्ये उभारले जावे यासाठी समितीने आ.संदीप क्षीरसागर यांना निवेदन दिले. यावेळी या स्मारकासाठी आपण प्रयत्नशिल असून तुमच्यासोबत असल्याचे आ. क्षीरसागरांनी समितीच्या पदाधिकार्यांना सांगून बीड पंचायत समितीमध्ये कै. अण्णासाहेब पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले. यावेळी कै अण्णासाहेब पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष रवि शिंदे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा बीड मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड, शिवक्रांती युवा परिषद, या सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सभापती बळीराम गवते, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर, स्वप्निल गलधर, शैलेश जाधव, संतोष जाधव, अविनाश नाईकवाडे, केके वडमारे गणेश बजगुडे, नितीन धांडे, बाबु लव्हाले,रमेश चव्हाण, भाऊसाहेब डावकर, नगरसेवक किशोर पिंगळे, युवराज जगताप, गोपाळ धांडे, अशोक सुरवसे, गोरख शिंदे, किशोर गिरा म शरद चव्हाण, विठ्ठल बहिर, युवराज मस्के, सचिन पवार, गोरख गायकवाड, आनंद शेंडगे, जय मल्हार बागल ,कुंदन काळे, शिवराज माने, बालाजी पानझडे, कामरान शेख,अनिल मोरे, बाळासाहेब आहेर, वैभव काठले, नारायण सपकाळ, विद्या ताई जाधव, अमित चव्हाण, कल्याण बहिर, यावेळी सर्व मराठा समाजातील युवक उपस्थित होते.