कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील उपसासिंचन योजनेसाठी भरीव निधीची तरतूद उपलब्ध होणार
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील कृष्णा खोऱ्यातील भागास वाट्यास आलेल्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी कृष्णा खोरेचा भाग असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उपसासिंचन क्रमांक १ आणि उपसासिंचन क्रमांक २ या दोन्ही योजना दोन वर्षात पूर्ण व्हावेत यासाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली असता जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी या दोन्ही योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देऊन दोन्ही वर्ष मध्ये या दोन्ही योजनांची कामे पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे अशी माहिती आ.सुरेश धस यांनी दिली.
उस्मानाबाद येथील जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
पुढे बोलताना आ. धस म्हणाले की,कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने २००९ मध्ये प्रशासकीय मान्यता असून उस्मानाबाद जिल्ह्यात ५.३२ अब्ज घनफूट आणि बीड जिल्ह्यात १.६८ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध केलेले आहे. कृष्णा खोऱ्यातील उस्मानाबाद आणि बीड हे दोन जिल्हे अवर्षणप्रवण क्षेत्रातील असून या ठिकाणी शाश्वत स्वरूपाचे पाणी आणि शेतकऱ्यांना जलसिंचन सुविधा पासून वंचित राहावे लागले आहे. सण २०२०-२१ आणि २२ या आर्थिक वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना क्रमांक १ आणि उपसासिंचन क्रमांक २ या दोन्ही योजनांसाठी ६६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ही दोन्ही कामे दोन वर्षात पूर्ण व्हावीत यासाठी सर्व निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली असता जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन दोन वर्षात कामे पूर्ण होतील. यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही आश्वासन दिले आहे.असेही त्यांनी शेवटी सांगितले.