पाच तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : आज जिल्ह्यात 165 नव्या रुग्णांची भर पडली. यात पाच तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण आढळुन आले. जिल्ह्यात आकडा कमी हात असल्यामुळे बीडकरांना दिलासा मिळत असला तरीही नागरीकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 2895 अहवालचे रिपोर्ट प्राप्त झाले यात 2730 निगेटिव्ह आले तर 165 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 05, आष्टी 29, बीड 25, धारुर 04, गेवराई 20, केज 28, माजलगाव 06, परळी 14, पाटोदा 07, परळी 22, वडवणी 05 असे एकूण 165 रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. आकडा कमी होत असला तरीही नागरीकांनी खबरदारी घेत कोरोनाला हद्दपार करण्याची गरज आहे.