-नागरीकांनी दक्ष राहण्याची गरजप्रारंभ वृत्तसेवानेकनुर प्रतिनिधी : नेकनूर पासून दक्षिणेस आठ किलोमिटरवरील कळसंबर परिससरात आज दुपारी साडेबारच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झांले. शेतातुन घरी जात असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केला. यात येथील शेतकरी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेणे सुरु आहे. परिसरातील नागरीकांनी भिती न घेता दक्ष राहावे असे आवाहान वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांची केले आहे.
येथील आजिनाथ वाघमारे वय 40 हे शेतातुन घरी जात असताना त्यांच्यावर बिबटयाने हल्ला केला यात ते जखमी झाले. सध्या यापरिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे, दिनेश मोरे, अच्युत तोंडे, श्री डोंगरे व त्यांची टिम दाखल झाली होती. यासह नेकनुर पोलीसांनी सुद्धा या परिसरात धाव घेतली होती यावेळी एपीआय लक्ष्मण केंद्रे व त्यांची टिम याठिकाणी उपस्थिती होती.
प्रथमदर्शी बिबट्याच असल्याची शक्यता असून आम्ही संपुर्ण परिसराची पाहणी केलेली आहे. आमचे पथक याठिकाणी 24 तास गस्तीवर असणार आहे. या परिसरातील नागरीकांनी घाबरुन जाऊ नये परंतु सर्वांनी घबरदारी घेण्याची गरज आहे. शेतात एकटे जाणे टाळावे, शेतात ग्रुप मध्ये कामे करावीत, शेतात काम करत असताना मोबाईल मध्ये गाणे लावावीत, गळ्याला काही तरी बांधावे अशा प्रकारे येथील नागरीकांनी घबरदारी घ्यावी असे आवाहान वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी नागरीकांना कले आहे.