महाराष्ट्र पोस्ट सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाकसेवक नोकरभरतीसाठीच्या ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आता १० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी ती 26 मे पर्यंत होती. कोरोना आणि तौक्ते चक्रीवादळाची परिस्थिती लक्षात घेता ही तारीख वाढवण्याची मागणी लोकाधिकार समिती सरचिटणीस अजित परब यांनी मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश अग्रवाल यांना पत्राद्वारे केली होती. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरभरती होते आहे. २७ एप्रिल २०२१ पासून पोस्टातील नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार पोस्टातील या जागांसाठी इच्छुक आहेत त्यांनी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पोस्ट ऑफिसच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये २,४८२ पदे भरण्यात येणार आहेत. या नोकरभरतीत ‘ग्रामीण डाक सेवक’ या पदासाठीची रिक्त पदे भरली जाणार आहेत.