दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : देशात सध्या कोरोनाने कहर सुरु असल्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांना याचा मोठा फटका बसला आहे. आता इतर राज्यात सुद्धा कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. सध्या देशात विविध लस,बेड यासह इतर बाबींचा तुटवडा झाला आहेे. सध्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यासह दोन दिवसाचे अधिवेशन बोलवावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशात अभुतपुर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही व लस देखील उपलब्ध होताना दिसत नाही. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेत किमान दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यातद यावे अशी मागणी संजय राऊत यांनी ट्विट द्वारे केली आहे.