_ताई अन भाऊ कृपा करा आपले काही खाजगी डॉक्टरांसोबत असलेले नातेसंबंध अन हितसंबंध काही काळासाठी बाजूला ठेऊन सामान्य नागरिकांसाठी ५०० खाटांचे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारा_*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) १२ डॉक्टरांची मान्यता असलेले येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवून कोविड व नॉन कोविड रूग्णांना दिलास द्या. आजी माजी पालकमंत्र्यांनी आपापसातील “महाभारत” बाजूला ठेऊन जनतेच्या आरोग्यासाठी “संजीवनी” देण्याचे करावेत प्रयत्न करावेत असे आवाहन परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित घाडगे पाटील यांनी केले आहे.
सध्या सामान्य जनता जगण्यासाठी लढत असताना, तुमच्या ट्विटर वॉरच्या फुटकळ बातम्या बघून जनसामान्य हवालदिल झाले आहेत. सध्या आपापसातील मतभेद बाजूला ठेवा आणि जनतेच्या हितासाठी प्रयत्न करा.
प्रत्येक वेळी रुग्ण व्हेंटिलेटर, सी टी स्कॅन, एक्स रे, सोनोग्राफी, इ सी जी, रक्त तपासणी, अगदी फ्रॅक्चरसाठीही कधीपर्यंत अंबाजोगाई येथे पाठविले जाणार. कित्येक रुग्णांची “जीवन ज्योत” याच प्रवासात मालवली आहे. ऍम्ब्युलन्स सध्या वेटिंगवर आहेत.
प्राप्त माहितीनुसार सरकारी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याऐवजी शहरातील सहा खाजगी कोविड रुग्णालयांना मान्यता देऊन त्यांच्या घशात जनतेच्या घामाचा पैसा कोंबण्याचे पाप करू नका. आधीच लॉकडाऊन झाल्याने जनता त्रस्त आहे. काम नाही, पैसा नाही, अन्न अन्न दशा झालेली असताना असे झाले तर जनता कोणालाही माफ करणार नाही.
सध्या आरोग्य आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तुमच्या राजकारणामुळे सामान्य लोकांचे जीव गेले तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा शासनाला नोंद करायला भाग पाडूच पण निष्पाप जीवांच्या अंतानंतर तुम्हांलाचं तुमच्या अंतरात्म्यास उत्तर देता येईल का? याचा क्षणभर विचार करून बघा असेही घाडगे पाटील म्हणाले.
त्यामुळे त्वरित कारवाई करून 500 खाटांच्यासाठी रुग्णालयासाठी लागणारी व्यवस्था उभारणीसाठी तुमची ताकद पवार, ठाकरे, गांधी किंवा मोदींच्याकडे खर्ची घाला अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जायला तयार रहा. तसेच सर्व जनहिताच्या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित घाडगे पाटील यांनी दिला आहे.
ना. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना विनंती आहे की एकतर मतदार संघातील प्रत्येकाला मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेता येईल असे आर्थिक दृष्ट्या सक्षम करा. किंवा मुंबईतील सेंट जॉर्ज, जे जे किंवा लोकमान्य टिळक हॉस्पिटलसारखी यंत्रणा परळी वैजनाथ येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उभी करा : अमित घाडगे पाटील
सरकारी दवाखान्यात डॉ. दिनेश कुर्मे व त्यांचे सहकारी त्यांना उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीसह गेल्या एक वर्षांपासून एकाकी लढत देत आहेत. त्यांना ताकद द्यायची सोडून त्यांना तुमचेच कार्यकर्ते फोनाफोनी करून बेजार करत आहेत त्यांना आवर घाला. जर एकाच वेळी कंटाळून सर्व सरकारी वैद्यकीय यंत्रणांनी आपले हात झटकले तर त्या नंतर येणाऱ्या आरोग्य आणीबाणीस ताई भाऊंचे राजकारण कारणीभूत असेल.