२८ लाख भाविकांपैकी फक्त १८ हजार चाचण्या
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : सध्या हरिद्वार मध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या १०२ भाविकांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे २८ लाख भाविकांपैकी फक्त १८ हजार भाविकांच्याच चाचण्या आता पर्यंत करण्यात आल्या आहेत. यात अजुन भाविक कोरोना पाॅझिटिव्ह निघण्याची शक्यता आहे. पविञ स्नानासाठी साधुंसह भाविकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली आहे. यामुळे प्रशासन हातबल होताना दिसत आहे.