गढी येथे आठ दिवसात २०० बेडची सोय होणार
आज झालेले बैठकीत या निर्णय घेण्यात आला
प्रारंभ वृत्तसेवा
बीड: जिल्ह्यात बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत असल्यामुळे आज माजी.आमदार अमरसिंह पंडित यांनी गढी येथे २०० खाटांचे कोव्हिड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
गेवराई तालुक्यात वाढत असलेल्या कोविड रुग्णाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री.अमरसिंह पंडित यांनी आज आरोग्य विभागाचा आढावा घेतला, यावेळी तहसीलदार श्री. सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे उपस्थित होते. यावेळी यात गढी येथील शिवाजीनगर येथील जय भवानी शिक्षण संकुलात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील आठ दिवसात याठिकाणी १०० खाटांचे कोव्हिड केअर सुरु करण्याच्या सुचना मा.आ.अमरसिंह पंडित यांनी दिल्या. यानंतर राहिलेले १०० खांटाची सोय होणार आहे. या २०० खाटांच्या कोव्हिड सेंटर मुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे. गेल्यावेळेस सुद्धा शिवछञ परिवारांना कोरोना काळात मदत केली होती.