प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राज्यात लाॅकडाऊन केल्या शिवाय पर्याय नाही असे संकेत मुख्यमंञी यांनी सर्व पक्षीय बैठकीत व्यक्त केले.
आज पाच वाजता मुख्यमंञी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. यात राज्यात कोरोना रोखण्यासाठी काय करावे याविषयी यात सविस्तर चर्चा झाली असुन सुरुवातीला मुख्यमंञी यांनी लाॅकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. तर विरोधी पक्ष नेते म्हणाले की लाॅकडाऊन करायचे असेल तर विशेष पॅकेज ची घोषणा करा. यामूळे राज्यात लाॅकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुर्ण लाॅकडाऊनला भाजपाने विरोध केला आहे. सध्या अजूनही बैठक सुरु असुन नेमके काय निर्णय होते. ते बैठक झाल्यावर समजणार आहे.