कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : कोल्हापुर मधील दोन मुलींची लग्न थाटामाटात पार पडली होती. परंतु सासरी दोन्ही मुलींची कौमार्य चाचणी करण्यात आली, यात दोन्ही मुली फेल ठरण्यामुळे सासरच्या मंडळीने दोन्ही नववधुंना माहेरी पाठवल्याचा अत्यंत वाईट प्रकार कोल्हापुरात दोन दिवसापुर्वी उघड झाला
थाटामाटात दोन्ही मुलींची लग्नं झाली, आईला जीव सार्थकी लागल्याचा आनंद झाला.
पण लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी दोन्ही मुलींना सासरवाडीत कौमार्य चाचणीला सामोरे जावे लागले.
या चाचणीत नापास झाल्याचा ठपका ठेवत पाच दिवसानंतर सासू आणि पतीने दोन्ही नववधूना कोल्हापूरला माहेरी पाठवले. परत घेऊन न जाता जात पंचायत बोलावून काडीमोड घेतला.
गरिब परिस्थिती असल्यामुळे विविध समस्यांचा सामना करत आईने दोन मुलींना चांगले शिक्षण दिले. यासह थाटामाटात त्यांची लग्न करुन दिली. परंतु लग्नाच्या दिसर्या दिवसी दोन्ही मुलींची कौमार्य चाचणी करण्यात आली यात एक मुलगी या चाचणीत फेल ठरली. यामुळे दोन्ही मुलींना पाचव्या दिवशी माहेर पाठवण्यात आले. यासह पंचायत बोलावून काडीमोड सुद्धा घेण्यात आल्याचा प्रकार कोल्हापुरात उघड झाला आहे. दोन्ही तरुणींचा विवाह बेळगाव येथील दोन सख्या भावांसोबत झाला होता. या प्रकरणी मुलींच्या आईने पोलीसांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.