अनेकांकडुन साठा करत जास्त पैसाची मागणी: मुंबईत साठा करणार्यांवर कारवाई
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणार्या रेमडेसिवीर ची राज्यात चणचण निर्माण झाली आहे. याचा फायदा काही मेडिकल वाले कसा प्रकारे घेत आहेत. हे मुंबईत झालेल्या कारवाईतुन समोर आले आहे. जिल्ह्यात सुद्धा रेमडेसिवीरची विक्री पाच ते सहा हजारापर्यंत होत असल्याची चर्चा आहे. असे जर होत असेल तर संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यात व राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे राज्यसरकार या परिस्थितीचा सामना कसा करावा यासाठी विविध उपाय योजना करत आहे. त्यात रेमडेसिवीरचे संकट उभे टाकले आहे. रेमडेसिवीरचे उत्पन्न कमी व मागणी जास्त असल्यामुळे राज्यात रेमडेसिवीरचा तुटवटा निर्माण झाला आहे. ज्यांच्याकडे रेमडेसिवीर उपलब्ध आहेत, त्यांकडून जास्त पैसाची मागणी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची यात धावपळ होत आहे. राज्यात रेमडेसिवीर जास्त पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.