नगरपरिषद निवडणूक प्रचारार्थ उद्या हेलिकॉप्टरने करणार जाहीर सभा
बीड । भाजपच्या स्टार प्रचारक तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे हया उद्या धुळे, जळगाव व बुलढाणा जिल्हयाचा झंझावाती प्रचार दौरा करणार असून नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
उद्या (ता. ३०) सकाळी ८ वा. ना. पंकजाताई मुंडे गोपीनाथ गड येथून हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत. उद्या त्यांची पहिली सभा धुळे जिल्हयातील पिंपळनेर ता. साक्री येथे सकाळी १० वा., त्यानंतर सिंदखेडा येथे सकाळी ११ वा. होणार आहे. जळगाव जिल्हयात मुक्ताईनगर येथे दुपारी १२.३० वा. तर लोणार जि. बुलढाणा येथे दुपारी २ वा. त्या जाहीर सभा घेणार आहेत.
















