सभा व कॉर्नर बैठकांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड प्रतिनिधी :- शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार आहे, फक्त एकदा मतदानरूपी आशिर्वाद देऊन बीड शहराच्या विकासाचा अध्याय सुरू करण्याची संधी द्या. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारांना केले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे आणि प्रभाग क्रमांक ९,१०,११ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी शहरातील राजीव गांधी चौकात जाहीर सभा घेतली यावेळी आ. क्षीरसागर बोलत होते. या सभेला मतदारांची आलोट गर्दी दिसून आल्याने बीड करांच ठरलं तुतारी वाजणार अशी चर्चा सुरू झाली होती. ही तीन प्रभागाची नाही तर शहराची सभा असल्याचे गर्दी वरुन दिसून येत होते. तर प्रभाग १२ आणि १७ येथे ही प्रचारार्थ कॉर्नर सभा पार पडल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे यांच्या प्रचारार्थ तसेच प्रभाग ११ च्या उमेदवार मोमीन खमरुनीसा शरफुद्दीन, पठाण आफसरखान करीमखान, प्रभाग १० चे उमेदवार शिवाजी विश्वनाथ जाधव, ज्योती लक्ष्मीकांत रुईकर तसेच प्रभाग च्या ९ रेखा पिंगळे, शेख अथर (बब्बू भाई) या तीन प्रभागाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी राजीव गांधी चौक भागात तर कॉर्नर सभा झाली. तर प्रभाग १७ चे शेख शाकेर फकिर महमद, अमृता मुकूंद भोसले यांच्या प्रचारार्थ कारंजा चौक भागात कॉर्नर सभा झाली. यानंतर प्रभाग १२ चे उमेदवार ॲड.आदर्श अरूण जाधव, शेख जैनाबबी वसीम यांच्या प्रचारार्थ बालेपीर भागात सभा घेऊन आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असल्याने कोणी काही ही म्हटले तरी बीडच्या मतदारांच्या मनात तुतारी अन् मशालच असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी वैयक्तिक गाठीभेटी घेत मतदारांशी आ. संदीप क्षीरसागर हे संवाद साधत आहेत. त्यांच्या या प्रचाराला मतदरांचा जातील तिथे मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे बीड नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचाच झेंडा फडकणार असे चित्र दिसून येत आहे. तर यावेळी बोलताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले की, मी बोलत नाही तर करुन दाखवितो हे शहराला आणि मतदारसंघाला असून, शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगून शेवटी त्यांनी नगरपरिषदेत काम करण्याचा आणि शहराचा अभ्यास असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे यांच्या नावासमोरील तुतारी चिन्हावर आणि शहरातील २६ प्रभागातील ५२ नगरसेवक पदाच्या तुतारी आणि मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, राजेंद्र मस्के, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















