बीड प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यां साठी असतात. नागरीकांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून,
विकासाचे धोरण घेऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. परंतु दुर्दैवाने बीड मध्ये असे घडताना दिसत नाही. काही लोकांनी आपला राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवला. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी जनतेला गृहीत धरून राजकीय रिंगणात उतरले आहेत. त्यांना विकासाची चिंता नाही अथवा जनतेच्या भल्याची ही चिंता नाही.
गांधीनगर हा बीड शहराचा विस्तारित भाग. या भागात गोरगरीब जनता मोठ्या प्रमाणात राहते. या भागात रस्ते पाणी लाईट मूलभूत सुविधांची सुव्यवस्था पोहोचलेली नाही. आगामी काळात या भागाचा कायापालट करण्यासाठी
आ. संदीपभैया क्षीरसागर ,सलीम भाई बीड नगरपालिकेच्या माध्यमातून विकासाला गती देतील असा विश्वास यावेळी राजेंद्र मस्के यांनी दिला.
काल गांधीनगर प्रभाग क्र. 26 (अ) व 26 (ब) मध्ये आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य कॉर्नर सभा
आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम भाई, राजेंद्र मस्के,शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख गणेशराव वरेकर, परमेश्वर सातपुते, वैजनाथ तांदळे तसेच आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेला गांधीनगर परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
कॉर्नर बैठकीला सभेचे स्वरूप आले बीड शहरातील जनता स्वच्छता, धुळ, पिण्याच्या पाण्याची गैरसोय अशा मूलभूत समस्येने ग्रासीत झाला असून प्रचंड संताप जनतेच्या मनात आहे. नागरिकांचा संताप मतदानाच्य रूपाने बाहेर पडेल. शहराचा शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार सौ स्मिता विष्णू वाघमारे व सर्व नगरपरिषद सदस्य उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.