परळी प्रतिनिधी -शहरातील माणिक नगर प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी तसेच प्रचार केला. या प्रभागामध्ये विकासकामे करण्यासाठी आपण उभे असल्याचे मतदारांना सांगितले. दरम्यान, या प्रभागात मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. महिलांनी प्रतिसाद देत सौ.संध्या देशमुख यांच्याशी संवाद साधला. माणिक नगर प्रभाग मध्ये अनेक नागरी सुविधा देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनुभवी आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलेलं व्यक्तिमत्व म्हणून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.संध्या देशमुख यांचे पती दिपक रंगनाथ देशमुख आहेत. अशा भावना मतदारांनी यावेळी संध्याताई यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केल्या. मतदारांचा हा पाठिंबा बघता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे मानले जाते.यावेळी, त्यांच्या समावेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

















