गेवराई प्रतिनिधी ः- ज्यांच्या अंगात कर्तृत्व नाही त्यांच्या हाती तुम्ही अनेक वर्षे नगर पालिकेची सत्ता दिली. चुकीच्या माणसाच्या हाती सत्ता दिल्यामुळे बीड शहराचे वाटोळे झाले. मला बीड शहरासह जिल्ह्यात चांगले काम करायचे आहे त्यासाठी तुमची साथ मला हवी आहे. नगर पालिकेची सुत्रे चांगल्या लोकांच्या हाती दिली तर चांगले काम होईल. त्यांना तुम्ही 35 वर्षे पालिकेची सत्ता दिली आता तुम्ही मला फक्त पाच वर्षे नगर पालिका ताब्यात द्या हा अजित पवार चांगले काम करून दाखवील याचा शब्द देतो. बीड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम मित्रपक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह नगरसेवक पदाचे 52 उमेदवार घडी आणि धनुष्यबाण चिन्हाचे बटन दाबून विजयी करून आम्हा सर्वांना चांगले काम करण्याची संधी द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांनी केले. बीड शहरातील सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स येथे नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.प्रेमलता पारवे यांच्यासह नगरसेवक पदाच्या 52 उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट झुंजार धांडे, संदिप आदमाने, डॉ.इद्रीस हाशमी, शिवसेनेचे कल्याण कवचट, सद्दाम खदीर, खमर अली खान यांनी ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केल.
![]()