प्रत्येक वॉर्डात मतदारांची तुतारीलाच पसंती
बीड प्रतिनिधी :- जातीपातीच्या समीकरणावर नाही तर विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूकीला सामोरे जात आहोत. कितीही प्रयत्न केला तरी बीडमधील सलोखा बिघडणार नाही. असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. वॉर्ड क्रमांक १,८ आणि १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते.
बीड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या स्मिताताई विष्णू वाघमारे तसेच वॉर्ड क्रमांक ०१ येथील उमेदवार अशोक मारूती काळे, बबिता सुधाकर जाधव यासह वॉर्ड क्रमांक १९ मधून उमेदवार असलेले शोएब हाफिजोद्दीन इनामदार, मिराबाई विठ्ठल जाधव आणि वॉर्ड क्रमांक ८ मधील मनिषा उल्हास गिराम, सय्यद अशफाक
सय्यद मोहम्मद सिद्दीक यांच्या प्रचारार्थ, बीड शहरातील शहूनगर, खडकपूरा आणि बुंदेलपुरा भागात कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रत्येक सभांना हजारो मतदार बांधव उपस्थित होते.
















