महायुती मिळून परळीला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी सहकाऱ्यांनी सज्ज व्हावे – धनंजय मुंडेंचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन
शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे, मी व धनु भाऊ मिळून त्यासाठी एकत्रित काम करू – ना. पंकजाताई मुंडे
परळीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ संयुक्त कार्यकर्ता मेळावा
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – परळीच्या मातीतील जनतेची सेवा आणि विकास हाच आपला ध्यास ठेवून मागील अनेक वर्ष आम्ही काम करत आलो आहोत, मागील काही कार्यकाळ नगरपरिषदेत प्रशासक होता, मात्र तरीही विकास कामांसाठी निधी खेचून आणण्यात कुठेही कमी पडलो नाहीत. परंतु गेल्या काही महिन्यात राजकीय स्वार्थापोटी काही लोकांकडून परळीची राज्यात जी बदनामी करण्यात आली, तिचे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी परळीतील जनता महायुतीच्या नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांच्या पाठीशी मतदान रोपे आशीर्वाद उभा करून भरघोस मतांनी विजयी करून देईल, असा विश्वास माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना व्यक्त केला.
परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या अधिकृत उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांचे सह आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता, या वेळी श्री. मुंडे बोलत होते.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना श्री धनंजय मुंडे म्हणाले की मी माझ्या जीवनात कोणतीही निवडणूक कधीच हलक्यात घेत नाही किंवा सोपी समजत नाही. आपणही या निवडणुकीला सोपे न समजता प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचून आपल्या विकासाचे विजन मांडण्याची आणि शंभर टक्के मतदान करून घेण्याची जबाबदारी ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सहकाऱ्यांची आहे. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे चित्र असताना सुद्धा परळी नगर परिषदेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अशी स्पष्ट महायुती एकत्रित लढत असून योग्य पद्धतीने जागावाटप करण्यात आले असून सर्वांनी एकत्रित महायुती म्हणून एकमेकांना सोबत घेऊन चालावे, अनेक विषयातील आपसातील मतभेद किंवा अन्य कोणत्याही असयुक्तिक बाबींचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही याची कार्य काळजी सर्वपक्षीय सहकाऱ्यांनी घ्यावी असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान माझ्यासह धनंजय मुंडे यांच्या कार्य काळामध्ये परळी वैद्यनाथ शहरांमध्ये कृषी महाविद्यालय, पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय यासारख्या अनेक शासकीय शिक्षण संस्था उभ्या राहत असून आगामी काळात परळी विद्यानगरी होईल त्यालाच अनुसरून शहरांमध्ये आर्थिक उलाढाल देखील वाढेल, यातूनच विकासाला देखील गती प्राप्त होईल. विकास पोहोचला पाहिजे, असे ब्रीद हाती घेऊन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी परळीच्या विकासासाठी काम केले. त्याचाच वसा घेऊन पुढे शेवटच्या माणसाच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू आणि विकासाचे शहर अशी ओळख परळी शहराला करून देऊ असे मत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी नेहमी गरिबांची कामे करावीत, गरिबांना कोणतीही जात नसते त्यामुळे नगरसेवकाची कामे दररोज जनता दरबार भरवल्याप्रमाणे दिसले पाहिजे अशी अपेक्षाही मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त करून दाखवली.
तीर्थक्षेत्र विकास आराखडा सह परळी शहरात अनेक विकासाची कामे सुरू आहेत तसेच अनेक कामे प्रस्तावित आहेत, वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेली कामे येत्या वर्षभरात पूर्ण करायची आहेत. त्यासाठी विकासाचे व्हिजन असलेले लोक प्रतिनिधित्व करणे गरजेचे आहे, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी केले, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे, रिपाइंचे सचिन कागदे, राष्ट्रवादीचे प्रा. विनोद जगतकर, भाजपचे जुगलकिशोर लोहिया यांनीही याप्रसंगी आपले मत व्यक्त केले.
व्यासपीठावर ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे, जुगलकिशोर लोहिया, शांतीलाल जैन, विजय वाकेकर, अजय मुंडे, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य तय्यब भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, प्रा. मधुकर आघाव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे, रिपाइंचे सचिन कागदे, भाजपच्या शहराध्यक्ष उमाताई समशेट्टी काकी, सुरेश टाक, आयुब भाई पठाण विनोद जगतकर, संदीप लाहोटी, आर. एच. वावळे, निळकंठ चाटे, वैजनाथ माने, अरुण टाक, प्रकाश जोशी, अजीज कच्ची, रवींद्र परदेशी, राजेंद्र सोनी, श्रीहरी मुंडे, राम कुलकर्णी, महादेव इटके शरद मुंडे, तुळशीराम पवार, नितीन कुलकर्णी, पी. एल. कराड, सुनील नाना फड, यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या वहाब कुरेशी, रवी मुळे तसेच बुंदेले यांनी संबंधित प्रभागातील महायुतीच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
*महायुतीचे अधिकृत उमेदवार*
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी
प्रभाग क्रमांक 1 अ चे उमेदवार वंदना अश्विनकुमार आघाव, प्रभाग क्रमांक 1 ब चे उमेदवार दीपक प्रल्हादराव मुंडे
प्रभाग क्रमांक 2 अ चे उमेदवार कविता अनंत इंगळे, प्रभाग क्रमांक 2 ब चे उमेदवार अल्ताफ सुरदार खान
प्रभाग क्रमांक 3 अ चे उमेदवार शेख हुसेना बी अमीन, प्रभाग क्रमांक 3 ब चे उमेदवार शेख अजीम मुजीब
प्रभाग क्रमांक 4 अ चे उमेदवार नितीन नामदेव रोडे,प्रभाग क्रमांक 4 ब चे उमेदवार शांता मुंजा नाईकवाडे
प्रभाग क्रमांक 5 अ चे उमेदवार सौ.जयश्री शंकराप्पा मोगरकर, प्रभाग क्रमांक 5 ब उमेदवार वैजनाथ भानुदास सोळंके
प्रभाग क्रमांक 6 अ चे उमेदवार बनसोडे अंजली केशवराव , प्रभाग क्रमांक 6 ब चे उमेदवार व्यंकटेश बाबुराव शिंदे
प्रभाग क्रमांक 7 अ चे उमेदवार सौ.उषा किशोर केंद्रे , प्रभाग क्रमांक 7 ब चे उमेदवार सचिन रामनाथ सारडा
प्रभाग क्रमांक 8अ चे उमेदवार महानंदा रामभाऊ वावळे,प्रभाग क्रमांक 8 ब उमेदवार शकील कुरेशी
प्रभाग क्रमांक 9 अ चे उमेदवार सुनील भाऊसाहेब कांबळे प्रभाग क्रमांक 9 ब चे उमेदवार पठाण कौसर राजाखान
प्रभाग क्रमांक 10 अ चे उमेदवार सरोजा गौतम डावरे प्रभाग क्रमांक 10 ब चे उमेदवार महेश गोविंदराव मुंडे प्रभाग क्रमांक 10 क चे उमेदवार कुसुम अण्णासाहेब चाटे
प्रभाग क्रमांक 11 अ चे उमेदवार महादेव नागनाथ रोडे , प्रभाग क्रमांक 11 ब चे उमेदवार जयश्री रवींद्र मुंडे गित्ते (बिनविरोध,)
प्रभाग क्रमांक 12अ चे उमेदवार सौ.प्राजक्ता भाऊसाहेब कराड, प्रभाग क्रमांक 12 ब चे उमेदवार योगेश विजयकुमार मीनकुदळे
प्रभाग क्रमांक १३ अ चे उमेदवार रेश्मा केशव बळवंत (बिनविरोध) प्रभाग क्रमांक १३ ब चे उमेदवार सौ.शिल्पा जयपाल लाहोटी
प्रभाग क्रमांक १४ अ उमेदवार पवनकुमार महादेव मुंडे, प्रभाग क्रमांक १४ ब चे उमेदवार डॉक्टर पूजा प्रितेश तोतला
प्रभाग क्रमांक १५ चे अ उमेदवार प्रतीक्षा रणजीत देशमुख ,प्रभाग क्रमांक १५ ब चे उमेदवार शेख आफ्रिन बेगम अन्वर
प्रभाग क्रमांक १६ अ चे उमेदवार सारिका सुशील हरंगुळे 16 ब चे उमेदवार तक की उल्हासूद उल्लाह खान
प्रभाग क्रमांक १७अ चे उमेदवार रूपाली रमेश पवार प्रभाग क्रमांक १७ब चे उमेदवार शेख अब्दुल रहमान हाजी बाबू अब्दुल रशीद
















