आष्टी प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा खडतर प्रवास,जिद्द,चिकाटी आणि मेहनत नक्कीच प्रेरणादायी आहे. विशेषतः आपल्या भागातील ऊसतोड मजूर आणि त्यांच्या पाल्याचे खरोखर कौतुक केले पाहिजे कारण कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी एकाग्रता, निष्ठा आणि सातत्य किती महत्त्वाचे असते याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी घालून दिले असल्याचे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले.
रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग,राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करून विविध शासकीय विभागांमध्ये तसेच सुरक्षा दलांमध्ये निवड झालेल्या होतकरू विद्यार्थ्यांचा आ.सुरेश धस यांच्या हस्ते सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेले चाहूरवाडी येथील श्री.नितीन भोलाजी खेंगरे यांनी SEBC प्रवर्गातून ५७३ गुण मिळवत राज्यात १३९ वा क्रमांक मिळवला त्यासोबतच तेजस रोहिदास भराटे यांची ग्राम महसूल अधिकारी पदी आणि शुभम बाळासाहेब माने यांची आरोग्य सेवक पदी निवड झाल्याबद्दल तर भारतीय सैन्य दलात निवड होण्याचा बहुमान मिळवलेल्या इथापे शंकर सोमीनाथ, दातीर रोहन गोरख, अमन लियाकत खान, देवकर करण विठ्ठल, गवते राहुल सुभाष, आंधळे रोहित रामकिसन, पवार ओंकार बद्रीनाथ, सारगुडे समाधान श्रीधर, कवादे सौरभ अण्णा, प्रथमेश भारत यादव, कृष्णा अनिल अंदुरे, बडे धनराज विजय, ऋषिकेश बप्पा राजपुरे, भरत महादेव शिंदे, अर्जुन विजय टोणपे, महेश दत्तात्रय काकडे, नवले प्रतीक नंदराम, सुद्रिक अभिषेक विजय, इरकर कृष्णा शिवदास, टकले सचिन गीताराम, सोनवणे सुदर्शन दादाराम, केकान वैभव आजिनाथ, ज्ञानेश्वर आत्माराम कदम, सोले आदित्य अंकुश, कोठरे माऊली महादेव, पोकळे ओम सुनील, भोसले श्रीराज सिताराम, पावसे विवेक दिनकर, गर्जे हर्षद विठ्ठल, सागर दिनकर गर्जे, बांगर ओंकार दत्तात्रय, देविदास तुकाराम तांबे, हंबर्डे विशाल रोहिदास, शुभम भाऊसाहेब गोंदकर, राहुल कुंडलिक जगताप, सुरज राजेंद्र जगताप, कोल्हे सुरज बाळू, डीसले रोहित अशोक, संदीप शिवाजी गर्जे आणि अविष्कार छगन निकम, महेश कालिदास गरकळ, अभिषेक सुनील गरकळ या सर्वांचा अभिमानाने गौरव करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्र पोलिस दलात निवड झालेल्या प्रियंका मल्हारी तांबे, घोडके दत्तात्रय गोरख व नागरगोजे किशोर शिवाजी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड झालेल्या जाधवर चंद्रकांत बंडू, घुमरे दीपक लक्ष्मण, रायकर सिद्धांत रंगनाथ, रूपवर अशोक गवाजी आणि कुदांडे दत्तात्रय जयसिंग यांचा देखील सन्मान करण्यात आला. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन करून गाव, समाज व जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आ.धस यांनी अभिनंदन केले.

















