परळी प्रतिनिधी – परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी, पक्षाचे निरीक्षक नरेंद्र काळे ,प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दीपक रंगनाथ देशमुख, तालुकाध्यक्ष बाबा शिंदे, नेते उत्तम माने यांच्या प्रमुख उपस्थितीत लाल फिती कापून,श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले.यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

















