सपकाळ यांनी आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार सय्यद सलीम, प्रभाग क्र. १० चे उमेदवार शिवाजीराव जाधव, किशोर पिंगळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून “तुतारी विजयी करण्याचा संकल्प” केला.
गेली तीन दशकापासून सुभाष सपकाळ हे स्व. केशरबाई क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, तसेच योगेश क्षीरसागर यांच्या निकट सहवासात राहून दीर्घकाळ सक्रिय राजकारणात सहभागी झाले होते. कठीण काळातही त्यांनी निष्ठा आणि बांधिलकी कायम ठेवली होती.
परंतु, योगेश क्षीरसागर यांच्या आत्मस्वार्थी आणि जातीय राजकारणामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीची संधी न देता वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षातील अनेक जुने समर्थक असंतोषाने व्यथित झाले असून, अखेर त्यांनी तुतारीच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रवेशाबद्दल जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले, “सुभाष सपकाळ यांसारख्या अनुभवी व निष्ठावंत नगरसेवकांचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी मोठी ऊर्जा ठरणार आहे. तुतारी ही सर्वसमावेशकता, विकास आणि जनतेच्या हक्काची लढाई यांचं प्रतीक आहे. आता बीड नगरपरिषदेत सामान्य जनतेची तुतारी गर्जना करणार आहे.”
अनुभवी कार्यकर्त्यांच्या या इनकमिंगमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील बळ वाढले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्वाचे राजकीय वजन प्राप्त झाले आहे.