गेवराई शहरातील मोमीनपुरा प्रभागात मतदारांशी साधला संवाद
गेवराई प्रतिनिधी ः- माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या संस्कारातूनच शिवछत्र परिवाराने सर्वधर्म समभाव राजकारण केलेले आहे. आदरणीय दादांचा वारसा भैय्यासाहेब आणि आम्ही पुढे चालवत आहोत. गेवराई शहरातील मोमीनपुरा भागातील मतदार बांधवांनी नेहमीच शिवछत्र परिवाराला सहकार्य केलेले आहे. त्यामुळे या नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक लिड मोमीनपुरा भागातून मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करून मोमीनपुरा भागाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले.
गेवराई नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितल महेश दाभाडे व प्रभाग क्र. ६ च्या उमेदवार सौ. वैशाली किशोर कांडेकर व जाकेरा बेगम इस्माईल शरीफ यांच्या प्रचारार्थ आ. विजयसिंह पंडित यांनी आज प्रचार रॅली काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी आवेजसेठ, किशोर कांडेकर, सय्यद वसोद्दीन, सय्यद असरोद्दीन, हाफीज गणीसाहब, सय्यद मोबीदीन, मसाया, सय्यद हासिफसेठ, सय्यद नसोद्दीन,शेख नदीम, अब्दुल जफर, अख्तर शेख, मोहसीन शेख, मोमीन जुनेद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदारांशी संवाद साधताना आ. विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजाला सदैव न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेवराई शहरात शादीखानामुळे गोरगरीब परिवाराचे लाखो रुपये वाचतील, मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानाला संरक्षण भिंतीचे बांधकाम केले, मुस्लिम समाजाचे इतर प्रश्नही यापुढील काळात मार्गी लावले जातील, जाती-धर्माचे राजकारण करून मते मागणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा आणि येत्या २ डिसेंबरला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितल दाभाडे यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमुदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रचार रॅलीला प्रभाग क्र.६ मधील मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

















