बीड प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या, पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची शहरातील डॉक्टर व वकीलांशी संवाद साधण्यासाठी (दि.२३, रविवार) सकाळी १०.३० वाजता लोकसेवा मंगल कार्यालय, आशा टॉकीज रोड, बीड येथे होणार आहे. या बैठकीत डॉक्टर वकील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वैद्यकीय आघाडी व लीगल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योती रवींद्र घुमरे यांच्या प्रचारार्थ या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ना.पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तांदळे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे यांच्यासह भाजपच्या वैद्यकीय आघाडी व लीगल सेलचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित असणार आहेत. बैठकीसाठी सर्व डॉक्टर आणि वकील संघाच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा, माजी नगरसेवक ॲड.महेश गर्जे, ॲड.रविंद्र धांडे, ॲड.राम दहिवाळ, ॲड.संगीता धसे, डॉ.अमोल गीते, डॉ.संजय वीर, डॉ.राजेंद्र भोरे यांनी केले आहे.

















