राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतली आहे.
मुंबई : राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती. परंतु, या परीक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं. मात्र, परीक्षेबाबत सरकारकडून एमपीएससी प्रशासनाला कोणतीही सूचना मिळालेली नव्हती. त्यातच राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले असून शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन आहे. त्यामुळे परीक्षा 11 एप्रिलला होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता ही परीक्षा होणार नसल्याचे निश्चित झाले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग व विद्यार्थ्यांना संभाव्य धोका लक्षात घेत येत्या ११ तारखेला होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी याबाबत अनेक विद्यार्थी व पालकांनी माझ्याशी संपर्क करून विनंती केली आहे. काही परीक्षार्थी स्वतः कोरोनाबाधित असल्याचेही समजले. 1/2
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 9, 2021
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो.#mpscexam #mhuexam
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 8, 2021
विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेत #mpscexam पुढे ढकलल्याबद्दल राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्याचे आभार
याच धर्तीवर १०वी/१२वी परीक्षांबाबत ही विचार व्हावा हि विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/fWYpIi52Tf
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) April 9, 2021